आरक्षण कोणाला द्यावे

         आरक्षण असावे की नसावे याबाबत वेगवेगळी मते आहेत. ज्या दीनदलित समाजाने वर्षानुवर्षे उच्चवर्णीयांकडून होणारी अवहेलना सहन केली, त्या वर्गाला घटनेने आरक्षण दिले. तो त्यांचा अधिकारच होता. एककल्ली विचार करून आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेणे हे लोकशाहीविरोधी कृत्य ठरेल. सामाजिक आणि आर्थिक स्थैर्यासाठी आरक्षण हे हवेच. म्हणूनच आरक्षणाचा इतिहासही जाणून घेणे तेवढेच महत्त्वाचे ठरेल.सामाजिक व आर्थिक स्थैर्यासाठी आरक्षण हवेच सामाजिक आरक्षणाबाबत अनेक मते-मतांतरे आहेत. प्रत्येक जण आरक्षणाची मागणी करीत आहे. हे अयोग्यच आहे.
           दीन-दलितांना, पिचलेल्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाचे हत्यार भारतर▪डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहाल केले. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळेच हा समाज आज मुख्य प्रवाहात आला आहे. हे प्रत्येकाने मान्यच केले पाहिजे. पूर्वीच्या काळात ही सोय होती काय? याचा पुनर्विचार केल्यास दलित समाजाला आरक्षणाची गरज का पडली? याचे उत्तर आपोआपच मिळाल्याशिवाय राहणार नाही. राजकीय इच्छाशक्ती काय असते? हे त्यावेळेस डॉ. आंबेडक र यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. डॉ. आंबेडकरांनी दलितोद्धारासाठी अनेक प्रयत्न केले.
समाजातील वंचित घटकांना विशेष अधिकार प्रदान करून पुढे आणले तर मागासवर्गीय समाजाला ते हवेच आहे. आरक्षण दिल्याने मागासवर्गीयांत सर्वकाही आलबेल आहे, असे समजण्याचे कारण नाही. आजही आदिवासी भागातील गावखेड्यातील मागासवर्गीय हलाखीचे जीवन जगत आहे. त्यांच्याकडे खर्‍या अर्थाने लक्ष देण्याची गरज आहे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामूहिकपणे प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी आरक्षणाचा रामबाण उपायच त्यांना तारू शकेल.

Comments

Popular posts from this blog

जीवनात वाचनाचे महत्त्व

वृक्षतोड एक समस्या

आयुष्य जगण्याची  पद्धत