आपत्ती आणि दक्षता

         भारत हा बहुसंख्य नैसर्गिक आपत्तीचा देश आहे वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनावृष्टी, अतिवृष्टी आणि पूर यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.बदलत्या पर्यावरणामुळे पावसाचा संतुलन बिघडते आहे.पायाभूत सुविधांचा बेफाम वाढ निसर्गातील मानवी हस्तक्षेप वाढत आहे दोन दशकांपासून दरवर्षी आसाम, बिहार व दक्षिण भारतात पूर येत आहे जीवितहानी बरोबरच कोट्यवधी च्या मालमतेचे नुकसान होत आहे .यावर  उपाय आहेत का?देशाच्या आणि  राज्यांच्या व स्थानिक पातळीवर काय उपाययोजना करणे गरजेचे आहे?
            ऑगस्टमध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या पुराचा विचार करून, नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात नेहमीपेक्षा जास्त पर्जन्यवृष्टी झाली .ती अतिवृष्टी काही दिवस सतत होत होती.सेन्ट्रल वॉटर कमिशन आणि हवामान खात्याचा अंदाज आणि आराखडे उपलब्ध होते  सुरक्षित लोकांना सुरक्षित स्थळी कधी हलवायलचे याचे ठोकताळे सरकारने बंधने गरजेचे आहे.पुरसंबंधीच्या निळी आणि लाल आतील असुरक्षित लोकांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करणे गरजेचे आहे नद्या या कोणा एका राज्याच्या मालकीच्या नसून ,ती राष्ट्रीय संपत्ती आहे .सेन्ट्रल वॉटर कमिशन च्या अखत्यारीत देणे हा पायाभूत निर्णय देशाच्या पातळीवर राबविणे उपयुक्त ठरू शकते.अलमपट्टी धरणातून वेळेवर पाण्याचा निचरा झाला नाही म्हणून पुराची तीव्रता  वाढली   पावसाने फुगलेल्या नद्यांच्या विसर्ग चांगल्या पद्धतीने करण्याची गरज आहे जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान झाले.असे का झाले?सहकारी संस्था आणि अन्य मालमत्तांच्या भिंती भक्कम असणे गरजेचे आहे छोटे व कमकुवत पूल असल्याने पडतात .सहकारी गृहनिर्माण संस्थानी आपल्या आवारात  आणि प्रत्येक घरात कोणते धोके निर्माण होतात  त्यावर  धोरण राबवायला  पाहिजे सुरक्षितता कशी सांभाळायची, कोणती उपकरणे उपलब्ध असावीत याची घरातल्या प्रत्येक व्यक्तीला जाणीव असणे गरजेचे आहे.

Comments

Popular posts from this blog

जीवनात वाचनाचे महत्त्व

वृक्षतोड एक समस्या

आयुष्य जगण्याची  पद्धत