मोबाईल शाप की वरदान

मोबाइलमुळे जगात क्रांती झाली हे खरेच! तसं बघितलं तर मोबाइल वरदानच ठरावा. कुठेही कधीही आपल्याला आपल्या माणसांना मित्रपरिवाराला, आणीबाणीच्या वेळी, महत्त्वाच्या कामासाठी मोबाइलमुळे संपर्क साधता येतो. आता मोबाइल सर्व थरांतील माणसं वापरायला लागलीत. त्यामुळे त्याचा दुरुपयोगही होऊ लागलाय. हे थांबवलं पाहिजे. त्याचा उपयोग चांगल्या तऱ्हेने करावा. सार्वजनिक ठिकाणी, वाहन चालवताना मोबाइलचा उपयोग व्यवस्थित करावा. वाहन चालवताना तर मोबाइलवर बोलूच नये. अश्लील एसएमएस करणाऱ्यांना शोधून काढून, जबर शिक्षा द्यावी. त्यांचे मोबाइल जप्त करावेत. मोबाइलचा अति वापर केल्याने आपल्या हृदयावरही परिणाम होऊ शकतो. म्हणून शक्यतो मोबाइल वापरणाऱ्यांनी त्याच्या उपयुक्ततेचा विचार करूनच वापर करावा. त्याचा दुरुपयोग होऊ देऊ नये. तो शाप नसावा.

Comments

Popular posts from this blog

जीवनात वाचनाचे महत्त्व

वृक्षतोड एक समस्या

आयुष्य जगण्याची  पद्धत