ऊसतोड कामगार माझे मायबाप

ऊस तोड कामगार माझे मायबाप
सगळे जेव्हा साखर झोपेत असते
तेव्हा उठते माझी माय
पहाटे-पहाटे भाकरी थापल्या चा आवाज
येतो माझ्या कानी  थप थप थप.

उजाडता उजाडता उठतो माझा बाप 
कोयता घेतो, त्याला धारदार करतो
नि निघतो फडाच्या दिशेने
उपाशीपोटी ऊस तोडत असतो माझा बाप
ऊसतोडण्याचा आवाज येतो  माझ्या कानी
ऊसतोड कामगार माझे माय बाप .

माय जातीय भाकरी  भाजी घेऊन फडात 
बाप टाकतो कोयता खाली
घोळयामेळ्यानं जेवण करी घाई  घाई
हातावर पाणी पडताच बाप घेतो कोयता उसतोडण्यासाठी 
माय बांधते मोळ्या
दोघांनाही असते आपले काम संपवण्याची घाई .

किती कष्ट करतात ते माझ्यासाठी,
किती सोसतात ते माझ्यासाठी  ,
शिकेन सवरेन ऑफिसर होईन
खूणगाठ बांधली मनाशी
सुखी ठेवीन माझ्या मायबापा 
ऊसतोड कामगार माझे मायबाप.

Comments

Popular posts from this blog

जीवनात वाचनाचे महत्त्व

वृक्षतोड एक समस्या

आयुष्य जगण्याची  पद्धत