मुक्यांचे पत्र मूकनायक

            जातिसंस्था आणि अस्पृश्यता ही भारतीय समाजजीवनातील कीड असून अस्पृश्यांना अतिशय दयनीय, मानहानीकारक जीवन जगावे लागत होते. महात्मा फुले ,महाराज सयाजीराव गायकवाड ,छत्रपती शाहू महाराज ,गोपाळ बाबा वलंगकर यांनी अस्पृश्यता निवारणाचे कार्य सुरू केले होते .परंतु वरिष्ठ जातीच्या मनोभूमिकेत काहीही बदल झाला नाही. डॉ बाबासाहेबांना शिक्षण घेताना, नोकरी करताना , मानहानीची अपमानास्पद वागणूकीची जाणीव झाली होती .त्यामुळे हिंदू धर्माच्या सामाजिक आणि मानसिक गुलामगिरीतून मुक्त करायचे म्हणजेच त्यांचे प्रबोधन होणे आवश्यक असल्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी  प्रबोधनाकरिता आणि लोकजागृतीचे  कार्य करण्यासाठी वृत्तपत्रासारखे प्रभावी माध्यम दुसरे असू शकत नाही असे त्यांना वाटू लागले .
             पंखशिवाय जसा पक्षी  त्याप्रमाणे समाजात विचार प्रवृत्त करण्यासाठी वृत्तपत्राची गरज असते असे डॉ  बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. महाराष्ट्रात अनेक वृत्तपत्र आले परंतु अस्पृश्याच्या समस्यांना वाचा फोडणारे त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणारे एकही वृत्तपत्र नव्हते .अस्पृश्यांच्या हिताचे चर्चा करायची असेल तर वृत्तपत्रांशिवाय अस्पृश्यांचे भवितव्य घडवता येणे अशक्य आहे असे त्यांना वाटले त्यातूनच त्यांनी अनेक वर्ष मूक असलेल्यांना  बोलते करणे आणि त्यांचे अंतकरण विचारांच्या माध्यमातून व्यक्त करणे यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 31 जानेवारी 1920 रोजी मूकनायक हे पाक्षिकाला जन्म दिला. त्याचबरोबर बहिष्कृत भारत (1927  ),जनता (1930  ),प्रबुद्ध भारत  1956 या वृत्तपत्रांना त्यांनी जन्म दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले वृत्तपत्र मूकनायक 31 जानेवारी 1930  मुकनायकाचा जन्म म्हणजे अस्पृश्यांच्या मुक्तिसंग्रामाला नवजीवन देणारी संजीवनी होती . बाबासाहेबांनी अस्पृश्यांना  त्यांच्या अस्तित्वाची व भवितव्याची जाणीव करून देणारे म्हणून वृत्तपत्राकडे पाहिले.
    मूकनायक हे नावही अर्थपूर्ण असेच आहे .बाबासाहेबांनी यानिमित्ताने   मूक समाजाचे नायकत्व स्वीकारण्याचाच संकेत  केला होता .मूकनायक पाक्षिकाच्या संस्थापक बाबासाहेब आंबेडकर तर संपादक  पांडूरंग नंदराम भटकर हे होते. या पाक्षिकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर अग्रलेख लिहित .आपल्या लेखनात बाबासाहेबांनी लोकम्हणी वाक्यप्रचाराचा उपयोग केलेला दिसून येतो .डॉ .बाबासाहेब यांच्या लेखनाची भाषा हे लोकशिक्षणाची होती .अर्थपूर्ण शब्द रचना आणि ठोस मनाला भिडणारी लेखनशैली
मूकनायक गाजले   मुकनायकाने मुक्यांच्या वेदनांना वाचा फोडली, निराधारांना आधार मिळाला .  सामाजिक व धार्मिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रातही अस्पृश्यांनी स्थान निर्माण केले पाहिजे ही जाणीव या नायकाच्या रुपाने अस्तित्वात आली .मूकनायक या वृत्तपत्राने अल्पवधीत केलेले कार्य लोकजीवन घडविणारे होते .त्यांनी पहिल्या अंकात मनोगत नावाचा अग्रलेख लिहिला होता  पुढील 13  अंकातही त्यांनी लेख लिहिले . मूकनायक  काढण्यासाठी छ.राजर्षी शाहू महाराजांनी 2500 रुपये आर्थिक मदत दिली होती.मुकनायकच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक धार्मिक बदल तर केलेस परंतु समाजाच्या उन्नतीसाठी ब्रिटिश सरकारला काही उपाययोजनाही सुचविल्या  होत्या .अस्पृश्यांचा उद्धार आणि उन्नती होण्यासाठी सामाजिक व धार्मिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रातही अस्पृश्यांनी स्थान निर्माण केले पाहिजे ही जाणीव या नायकाच्या रुपाने अस्तित्वात आली .मूकनायक या वृत्तपत्राने अल्पावधीत केलेले कार्य लोक जीवन घडवणारे होते परंतु डॉ.बाबासाहेबांचे अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते विदेशी गेल्यामुळे मूकनायक वृत्तपत्र सुरूवातीच्या बारा अंकानंतरचे अंक  ज्ञानदेव घोलप यांच्या स्वाधीन केले परंतु त्यांना या वृत्तपत्राचा भार सांभाळत न आल्यामुळे मूकनायक  बंद पडले.

Comments

Popular posts from this blog

जीवनात वाचनाचे महत्त्व

वृक्षतोड एक समस्या

आयुष्य जगण्याची  पद्धत