शेतकऱ्यांची खंत

शेत बहरलं होतं 
मन आनंदी झालं होतं 
भाववाढ नाही म्हणून 
मन कुठेतरी खचत होतं


कधी निसर्ग साथ देत नाही
तर कधी भाव वाढ होत नाही
जगावं तर शेतकऱ्यांनी जगावं
 तरी कसं तेच कळत नाही

दुष्काळ झाला की 
सरकार जाहीर करतं 
शेतकऱ्याला इतकी इतकी 
नुकसान भरपाई पण ती
शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते कधी

शेतकरी आत्महत्या करतो तरी का
हा प्रश्न सगळ्यांना पडतो,
तो किती संकटाना सामोरे जातो 
हे फक्त एक शेतकरीच समजून घेऊ शकतो.

Comments

Popular posts from this blog

जीवनात वाचनाचे महत्त्व

वृक्षतोड एक समस्या

आयुष्य जगण्याची  पद्धत