आदर्श शिक्षक

दगड गोट्या चिंचोक्याचा
खेळ खेळलेला .
खेळ नव्हे तो शिकवणी निराळी 
अ आ इ, A B C D,उजळणी 
मजेशीर पाठ करून घेणारे ,
शिक्षणाची गोडी लावली तुम्ही.

खुप विद्यार्थी घडवलेत तुम्ही ,
घडवत आहात.
ज्यात मी स्वतः ला नशीबवान समजते
आईवडिलांनंतर पहिले गुरू लाभलात मला .

ओढ मनाला होती भेटण्याची 
कधी भेटेल झालं होतं
ज्यांनी मला पहिल्यांदा 
अक्षरओळख करून दिली त्या गुरूला .

25 नोव्हेंबर सुवर्णदिन
आपल्या भेटीचा .
काही क्षण हे स्वप्न 
तर नव्हे असं वाटलं 
भेटले नि मन तृप्त झालं .

          

Comments

Popular posts from this blog

जीवनात वाचनाचे महत्त्व

वृक्षतोड एक समस्या

आयुष्य जगण्याची  पद्धत