प्रेम करायचं राहून गेलं

शाळेत असताना प्रेम काय असतं माहीतच नव्हत
       .......   म्हणून माझं प्रेम करायचं  राहूनच गेलं .
सहावीपासून  मुलींच्या हॉस्टेलला असल्यामुळे 
कधी मुलांशी संपर्क आलाच नाही .
         .......म्हणून माझं  प्रेम  करायचं राहूनच गेलं.
दहावीत असताना वाटायचं चांगल्या गुणांनी पास व्हायचंय
म्हणून फक्त अभ्यास आणि अभ्यासचं करायचे
        .......  म्हणून माझं प्रेम करायचं राहूनच गेलं
आता कुठं प्रेम काय असतं कळायला लागलं होतं पण काय करणार बारावी हा आयुष्याचा टर्निंग पॉईंट असतो म्हणून अकरावीच्या दिवाळीतच क्लास लावले नि बारावीचा अभ्यास सुरू केला
         .......  म्हणून माझं प्रेम  करायचं राहूनच गेलं.
नंतर शहरात गेले वाटलं होतं प्रेम करावे म्हणून पण प्रेमात पडलेल्या लोकांचे भांडणे पाहून नको वाटायला लागले प्रेम
        .......   म्हणून माझं  प्रेम  करायचं राहूनच गेलं
आपण कुणावर तरी प्रेम केलं तर  या समाजातील लोक आपल्या आईवडिलांना सुखानं जगू  देतील का
त्यांच्या इज्जतीचा विचार केला
         .......  म्हणून माझं प्रेम करायचं राहूनच गेलं

Comments

Popular posts from this blog

जीवनात वाचनाचे महत्त्व

वृक्षतोड एक समस्या

आयुष्य जगण्याची  पद्धत