स्वच्छ भारत

भारत भूमी ची वाढवू शान ठेवूनी जगात ताठ मान
मिळूनी सारे हाती घेऊ स्वच्छ भारत अभियान…धृ…

आरंभ करू या घरापासूनी मग आपुला शेजार
रस्ते, गल्ल्या, चौक, बागा भरतो जिथे बाजार
निर्मळ ठेवू  परिसर आपला दिसेल ना हो छान …१…

ओला आणि सुका कचरा करू वेगवेगळा
पर्यावरण रक्षणाचा असे मार्ग हा आगळा
जिरवू कचरा फुलवू बागा सुपीक करू हो रान…२…

सदा आम्हासी वंद्य आमुचे जवान अाणि किसान
प्रणाम सफाई कामगारांना कार्य त्यांचेही महान
प्रत्येकजण सामील होऊ स्वीकारू हो आव्हान…३…
स्वच्छ भारत अभियान  .......
स्वच्छ भारत अभियान.....

Comments

Popular posts from this blog

Rose डे

जीवनात वाचनाचे महत्त्व

प्रेम करायचं राहून गेलं