प्रेम करावे

जमेल तसे प्रत्येकाने ...
.....कुणावर तरी प्रेम करावे ...

कधी संमतीने ..कधी एकतर्फी ..
पण,दोन्हीकडे हि सारखे  करावे ..!!

प्रेम सखीवर करावे ..
बहिणीच्या राखीवर करावे ..!

आईच्या मायेवर करावे ..
बापाच्या छायेवर करावे ..!

प्रेम पुत्रावर करावे ..जमल्यास ,
दिलदार शत्रूवर हि करावे ..!

प्रेम मातीवर करावे ..
निधड्या छातीवर करावे ..!

प्रेम  पुस्तकावर करावे ..
प्रेम  प्राणिमात्रांवर हि करावे ..!!

शिवबाच्या बाण्यावर ...लताच्या गाण्यावर
प्रेम ..सचिन च्या खेळावर आणि
वारकर्यांच्या टाळाव र हि करावे !

महाराष्ट्राबरोबरच ..देशावर ...आणि ,
अगदी ..न चुकता .स्वतःवर ...जमेल तसे प्रेम
करावे .!!!!!!

Comments

Popular posts from this blog

Rose डे

जीवनात वाचनाचे महत्त्व

प्रेम करायचं राहून गेलं