बाप

बाप नेहमी  मुलांचं विचार करतो
आपले मुलं काय केल्याने सुखी होईल
हेच तो बघत असतो
बाप लेकाच्या नात्यात रुसवा नसावा 
नेहमी नात्यात गोडवा असावा
बाप लेकाच नात हे मैत्रीसारखं असावं
बाप रुसला ते लेकाने मनवावे,
लेक रुसला तर बापाने मनवावे
बापाच्या प्रत्येक कामात लेकाने मदत करावी
किती रे दिवस राहिलेत त्या बापाचे
पिकलं पान कधीतरी सुकणारच 
आहे तोपर्यंत मित्रासारखं जप त्याला
तुझ्याच्या सुख नाही देणं झालं तरी चालेल पण
निदान दुखवू तरी नको त्या बापाला

Comments

Popular posts from this blog

Rose डे

जीवनात वाचनाचे महत्त्व

प्रेम करायचं राहून गेलं