Posts

Rose डे

Rose त्या मातेला द्या जी जन्म देऊन आयुष्यभर  सांभाळते. Rose त्या बहिणीला द्या जी आपल्यावर नेहमी माया करते. Rose त्या भावाला द्या जो  सतत पाठीशी उभा राहतो. Rose त्या बापाला द्या जो स्वतः पेक्षा जास्त प्रेम आपल्या मुलांवर करतो. Rose गुरूला पण द्या जो आपल्याला आयुष्य जगण्याचा मंत्र देऊन जातो. Rose त्या मित्राला द्या जो आपल्या सुखदुःखात साथ देतो. Roseत्या मैत्रिणीला द्या जी तुमची कदर करते ,जी तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करते. Rose फक्त प्रियसीलाच द्यावं असं काही ठरलेलं नसतं. तुम्ही कोणालाही देऊ शकता ज्यावर तुम्ही प्रेम  करता

प्रेम करायचं राहून गेलं

शाळेत असताना प्रेम काय असतं माहीतच नव्हत        .......   म्हणून माझं प्रेम करायचं  राहूनच गेलं . सहावीपासून  मुलींच्या हॉस्टेलला असल्यामुळे  कधी मुलांशी संपर्क आलाच नाही .          .......म्हणून माझं  प्रेम  करायचं राहूनच गेलं. दहावीत असताना वाटायचं चांगल्या गुणांनी पास व्हायचंय म्हणून फक्त अभ्यास आणि अभ्यासचं करायचे         .......  म्हणून माझं प्रेम करायचं राहूनच गेलं आता कुठं प्रेम काय असतं कळायला लागलं होतं पण काय करणार बारावी हा आयुष्याचा टर्निंग पॉईंट असतो म्हणून अकरावीच्या दिवाळीतच क्लास लावले नि बारावीचा अभ्यास सुरू केला          .......  म्हणून माझं प्रेम  करायचं राहूनच गेलं. नंतर शहरात गेले वाटलं होतं प्रेम करावे म्हणून पण प्रेमात पडलेल्या लोकांचे भांडणे पाहून नको वाटायला लागले प्रेम         .......   म्हणून माझं  प्रेम  करायचं राहूनच गेलं आपण कुणावर तरी प्रेम केलं तर  या समाजातील लोक आपल्या आईवडिलांना सुखानं जगू  देतील का त्यांच्या इज्जतीचा विचार केला          .......  म्हणून माझं प्रेम करायचं राहूनच गेलं

आदर्श शिक्षक

दगड गोट्या चिंचोक्याचा खेळ खेळलेला . खेळ नव्हे तो शिकवणी निराळी  अ आ इ, A B C D,उजळणी  मजेशीर पाठ करून घेणारे , शिक्षणाची गोडी लावली तुम्ही. खुप विद्यार्थी घडवलेत तुम्ही , घडवत आहात. ज्यात मी स्वतः ला नशीबवान समजते आईवडिलांनंतर पहिले गुरू लाभलात मला . ओढ मनाला होती भेटण्याची  कधी भेटेल झालं होतं ज्यांनी मला पहिल्यांदा  अक्षरओळख करून दिली त्या गुरूला . 25 नोव्हेंबर सुवर्णदिन आपल्या भेटीचा . काही क्षण हे स्वप्न  तर नव्हे असं वाटलं  भेटले नि मन तृप्त झालं .           

बाप

बाप नेहमी  मुलांचं विचार करतो आपले मुलं काय केल्याने सुखी होईल हेच तो बघत असतो बाप लेकाच्या नात्यात रुसवा नसावा  नेहमी नात्यात गोडवा असावा बाप लेकाच नात हे मैत्रीसारखं असावं बाप रुसला ते लेकाने मनवावे, लेक रुसला तर बापाने मनवावे बापाच्या प्रत्येक कामात लेकाने मदत करावी किती रे दिवस राहिलेत त्या बापाचे पिकलं पान कधीतरी सुकणारच  आहे तोपर्यंत मित्रासारखं जप त्याला तुझ्याच्या सुख नाही देणं झालं तरी चालेल पण निदान दुखवू तरी नको त्या बापाला

शेतकऱ्यांची खंत

शेत बहरलं होतं  मन आनंदी झालं होतं  भाववाढ नाही म्हणून  मन कुठेतरी खचत होतं कधी निसर्ग साथ देत नाही तर कधी भाव वाढ होत नाही जगावं तर शेतकऱ्यांनी जगावं  तरी कसं तेच कळत नाही दुष्काळ झाला की  सरकार जाहीर करतं  शेतकऱ्याला इतकी इतकी  नुकसान भरपाई पण ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते कधी शेतकरी आत्महत्या करतो तरी का हा प्रश्न सगळ्यांना पडतो, तो किती संकटाना सामोरे जातो  हे फक्त एक शेतकरीच समजून घेऊ शकतो.

ध्येय

ध्येय प्रत्येकाचं असतं ध्येय गाठण्यासाठी प्रत्येकजण आपआपल्या परीने  लढा देत असतो स्वप्न पाहिले पाहिजे त्याचबरोबर आपण पाहिलेलं स्वप्न साक्षात उतरविले पाहिजे काहीही अडचणी आल्या तरीही त्यांना घाबरायचं नाही प्रयत्न करीत राहायचे  एकदिवस ते नक्कीच पूर्ण होईल त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं  जे प्रयत्न करत ना  त्याला त्याचं फळ दिलं जातं

मुक्यांचे पत्र मूकनायक

            जातिसंस्था आणि अस्पृश्यता ही भारतीय समाजजीवनातील कीड असून अस्पृश्यांना अतिशय दयनीय, मानहानीकारक जीवन जगावे लागत होते. महात्मा फुले ,महाराज सयाजीराव गायकवाड ,छत्रपती शाहू महाराज ,गोपाळ बाबा वलंगकर यांनी अस्पृश्यता निवारणाचे कार्य सुरू केले होते .परंतु वरिष्ठ जातीच्या मनोभूमिकेत काहीही बदल झाला नाही. डॉ बाबासाहेबांना शिक्षण घेताना, नोकरी करताना , मानहानीची अपमानास्पद वागणूकीची जाणीव झाली होती .त्यामुळे हिंदू धर्माच्या सामाजिक आणि मानसिक गुलामगिरीतून मुक्त करायचे म्हणजेच त्यांचे प्रबोधन होणे आवश्यक असल्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी  प्रबोधनाकरिता आणि लोकजागृतीचे  कार्य करण्यासाठी वृत्तपत्रासारखे प्रभावी माध्यम दुसरे असू शकत नाही असे त्यांना वाटू लागले .              पंखशिवाय जसा पक्षी  त्याप्रमाणे समाजात विचार प्रवृत्त करण्यासाठी वृत्तपत्राची गरज असते असे डॉ  बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. महाराष्ट्रात अनेक वृत्तपत्र आले परंतु अस्पृश्याच्या समस्यांना वाचा फोडणारे त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणारे एकही वृत्तपत्र नव्हते .अस्पृश्यांच्या हिताचे चर्चा करायची असेल तर वृत्तपत