Posts

Showing posts from November, 2019

मोबाईल शाप की वरदान

मोबाइलमुळे जगात क्रांती झाली हे खरेच! तसं बघितलं तर मोबाइल वरदानच ठरावा. कुठेही कधीही आपल्याला आपल्या माणसांना मित्रपरिवाराला, आणीबाणीच्या वेळी, महत्त्वाच्या कामासाठी मोबाइलमुळे संपर्क साधता येतो. आता मोबाइल सर्व थरांतील माणसं वापरायला लागलीत. त्यामुळे त्याचा दुरुपयोगही होऊ लागलाय. हे थांबवलं पाहिजे. त्याचा उपयोग चांगल्या तऱ्हेने करावा. सार्वजनिक ठिकाणी, वाहन चालवताना मोबाइलचा उपयोग व्यवस्थित करावा. वाहन चालवताना तर मोबाइलवर बोलूच नये. अश्लील एसएमएस करणाऱ्यांना शोधून काढून, जबर शिक्षा द्यावी. त्यांचे मोबाइल जप्त करावेत. मोबाइलचा अति वापर केल्याने आपल्या हृदयावरही परिणाम होऊ शकतो. म्हणून शक्यतो मोबाइल वापरणाऱ्यांनी त्याच्या उपयुक्ततेचा विचार करूनच वापर करावा. त्याचा दुरुपयोग होऊ देऊ नये. तो शाप नसावा.

शिक्षणाचा खेळखंडोबा

शिक्षणाने मानुस मोठा होतो ,   शिकल्या सवरल्याने  मनुष्यला योग्य - अयोग्यतेची जाणीव होते, शिक्षणानेच मानुष्य प्रगती साधु शकतो  आणि शिक्षण हे तर बाघिनिचे दूध आहे आणि हे दुध पिल्या नंतर मानुस गुरगुरल्या शिवाय राहत नाही असे ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. शिक्षणाचे खरे महत्व क़ाय हे तेव्हा कळले। शिक्षणाची मोठी परंपरा लाभलेल्या या देशात पूर्वी  गुरुकुल  शिक्षा पद्धति अस्तित्वात होती  आणि आज देखील प्रख्यात शैक्षणिक संस्था व महाविद्यालयांच्या माध्यमातून आपल्याला उच्च दर्जाचे शिक्षण मिळत आहे. परंतू आज जागतिकीकरणाच्या युगातच या शिक्षणाचा खेळखंडोबा का झाला? याची बरीच कारणे आहेत. शिक्षण हे दान राहिले नसून तो आता एक प्रकारे कॉरपोरेट व्यवसाय होऊन बसला आहे. सोबतच  नोकरी मिळविण्याचे साधन म्हणून देखील शिक्षणाकडे पाहण्याची प्रवृत्ती वाढीस लागली हे महत्त्वाचे कारण सांगता येईल. कारण की चांगले शिकले म्हणजे चांगली नोकरी मिळेल असा गोड़ गैरसमज आजकाल पालकांच्या मनात येत आहे. अर्थात ते बऱ्यास अंशी योग्यही आहे. मग याचबरोबर येणारा नोकर भरतीतील भ्रष्टाचार, कारकुनी पद्धतीचे शिक्षण, अभ्यासक्रमातील दोष, संस्थाचा

गुरू क्या होता है ।

जीवन जितना सजता हैं माता-पिता के प्यार से उतना ही महकता हैं गुरु के आशीर्वाद से समाज कल्याण में जितने माता पिता होते हैं खास उतने ही गुरु के कारण देश की होती हैं साख बिन गुरु नहीं होता जीवन साकार सिर पर होता जब गुरु का हाथ तभी बनाता जीवन का सही आकार गुरु ही हैं सफल जीवन का आधार

आयुष्य जगण्याची  पद्धत

आयुष्य जगण्याची एक पद्धत हवी जिथे आपली कदर नाही तिथं कधी जायचं नाही जे आपल्याला पचत नाही ते कधीही खायचं नाही जे खरं सांगूनही रागवतात त्यांना मनवत बसायचं नाही एकदा नजरेतून उतरले त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही वेळ पाहून बदलतो त्याला मित्र करायचं नाही आणि कितीही संकटे आली तरी कोणालाही घाबरायचे नाही

प्रेम करावे

जमेल तसे प्रत्येकाने ... .....कुणावर तरी प्रेम करावे ... कधी संमतीने ..कधी एकतर्फी .. पण,दोन्हीकडे हि सारखे  करावे ..!! प्रेम सखीवर करावे .. बहिणीच्या राखीवर करावे ..! आईच्या मायेवर करावे .. बापाच्या छायेवर करावे ..! प्रेम पुत्रावर करावे ..जमल्यास , दिलदार शत्रूवर हि करावे ..! प्रेम मातीवर करावे .. निधड्या छातीवर करावे ..! प्रेम  पुस्तकावर करावे .. प्रेम  प्राणिमात्रांवर हि करावे ..!! शिवबाच्या बाण्यावर ...लताच्या गाण्यावर प्रेम ..सचिन च्या खेळावर आणि वारकर्यांच्या टाळाव र हि करावे ! महाराष्ट्राबरोबरच ..देशावर ...आणि , अगदी ..न चुकता .स्वतःवर ...जमेल तसे प्रेम करावे .!!!!!!

भारतरत्न ते देशाचे

शिल्पकार ते घटनेचे, उद्धारक ते उपेक्षितांचे, विरोधक ते वर्णभेदाचे, भारतरत्न ते देशाचे…जय भिम ! दूत ते शांतीचे, प्रचारक ते समतेचे, प्रसारक ते धम्माचे, भारतरत्न ते देशाचे…जय भिम ! सागर ते ज्ञानाचे, पंडित ते कायद्याचे, अभिमान ते भारतीयांचे, भारतरत्न ते देशाचे…जय भिम !

स्वच्छ भारत

भारत भूमी ची वाढवू शान ठेवूनी जगात ताठ मान मिळूनी सारे हाती घेऊ स्वच्छ भारत अभियान…धृ… आरंभ करू या घरापासूनी मग आपुला शेजार रस्ते, गल्ल्या, चौक, बागा भरतो जिथे बाजार निर्मळ ठेवू  परिसर आपला दिसेल ना हो छान …१… ओला आणि सुका कचरा करू वेगवेगळा पर्यावरण रक्षणाचा असे मार्ग हा आगळा जिरवू कचरा फुलवू बागा सुपीक करू हो रान…२… सदा आम्हासी वंद्य आमुचे जवान अाणि किसान प्रणाम सफाई कामगारांना कार्य त्यांचेही महान प्रत्येकजण सामील होऊ स्वीकारू हो आव्हान…३… स्वच्छ भारत अभियान  ....... स्वच्छ भारत अभियान.....

जीवनात चुका तर होणारच

जीवनात चुका तर होणारच चुकांना कधी घाबरायचे नसते, पहिले स्वतःच्या मनाला सावरायचे असते. मग चुकलेला गोष्टींना आवरायचे असते. सर्वजण जीवनात जगत असताना चुकत असतात त्यामुळे टेन्शन घ्यायचं नसतं, प्रत्येक चुकांमुळं एक नवीन अनुभव येत असतो त्यामुळे जीवन जगण्याची खरी मजा येत असते. चुका करा जीवनात पण, कोणालाही कधीही दुखवू नका . सर्वांना नेहमी प्रेम द्या , विनाकारण टेन्शन मध्ये राहू नका. आहेत थोडे दिवस आणखी चांगल्या, पद्धतीने जगून पहा . चुका झाल्या तरी स्वतःला  त्यामधून सावरत जीवन जगत जा.

नशीब हे असच असतं

नशीब हे असच असतं जी माणसे हवीशी वाटतात ती कधीही भेटत नाही जी माणसे नकोशी वाटतात त्यांचा सहवास संपत नाही ज्यांच्याकडे जावेसे वाटते त्यांच्याकडे जायला जमत नाही ज्यांच्याकडे जाऊ नये असे वाटते त्यांच्याकडे जावेच लागते जेंव्हा जीवन नकोसे वाटते तेंव्हा काळ संपत नाही जेंव्हा जीवनाचा खरा अर्थ कळतो तेंव्हा काळ संपलेला असतो नशीब हे असच असतं

प्रत्येक व्यक्तीच आयुष्य ही एक वेगळी कथाच

प्रत्येक व्यक्तीच आयुष्य ही एक वेगळी कथाच असते. अशी कथा जिचा पैलू न पैलू हा फक्त त्याच व्यक्तीला माहिती असतो.जगाला जे सांगितलं ते आणि जगापासून लपवलं ते देखील. अनेकदा देवाचे आपण आभारच मानावेत की त्याने मन ही गोष्ट कुणालाही दिसणार नाही अशी बनवली आहे.     प्रत्येक व्यक्तीची स्वप्न ,आकांक्षा , दुखः आनंद ह्या सगळ्याचा विचार करताना एक गोष्ट नेहमी जाणवते ते म्हणजे प्रत्येक व्यक्ती वेगळी... त्याचे विचार , त्याचे संघर्ष आणि त्याच्या आनंदाच्या जागाही वेगळ्या....पण गम्मत अशी असते की दुसरी व्यक्ती ही आपल्यापेक्षा जास्त सुखी आहे असा गैरसमज प्रत्येकाचा असतो. आमचे मराठीचे सर नेहमी म्हणायचे बंध मुठ ही सव्वा लाखाची असते. ती उघडली की तीच रितेपण जगासमोर येत. माणसाचं पण तसच असत. मोठेपणाच ओझ हे मानेवर ठेवलेल्या सुरीसारख असत. जोवर तुम्ही मदत मागत नाही तोवर तुमची सकारात्मक प्रतिमा समोरच्या व्यक्तीच्या मनात रहाते आणि तोपर्यंतच तुमच्याविषयीचा आदर हा टिकून रहातो. तुमच्यातील माणूस म्हणून असलेल्या मर्यादा ह्या कुणी विचारात घेत नाही. त्यामुळेच तुम्हालाही कधी गरज पडू शकते , तुम्ही चुकू शकता कारण तुम्ही देव नाही ह्