Posts

Showing posts from October, 2019

शिवाजी महाराज

       छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द नुसते उच्चारले की सर्रकन अंगावर काटा उभा रहातो.महाराष्ट्रातच नाही,भारत देशातच नाही तर संपुर्ण विश्वातअतुलनीय्,अद्वितीय्,अलौकीक असा दुसरा शिवाजी राजा सापडण अवघड आहे.जगातल्या साहसी,पराक्रमी आणि सफल अशा राजांमध्ये शिवाजी महाराजांचा समावेश करावाच लागेल.अलेक्सांडर्,नेपोलियन बोनापार्ट्,ज्युलियस सीझर वगैरे योद्ध्यांइतकेच महाराजांचे कर्तुत्व होते,नव्हे काही प्रमाणात यांच्यापेक्षा जास्तच महाराजांचे कर्तुत्व होते. कारण या राजांकडे तयार सैन्य,भुभाग होता.तर महाराजांना सर्व शुन्यातुन उभे करावयाचे होते. हे राजे आपल्या आयुष्यातील शेवटची निर्णायक लढाई हरले तसेच त्यांचा त्याच पराजीत अवस्थेत अंत झाला त्याचबरोबर त्यांच्या मृत्युनंतर त्यांचे साम्राज्य लोप पावले. पण महाराजांनंतर त्यांचे साम्राज्य टिकले आणि वाढलेही.               शिवाजी महाराज युगपुरुष होते. त्यांनी अनेक नव्या गोष्टी सुरु केल्या . देशातले पहीले 'खडे सैन्य' त्यांनी उभे केले. त्यांनी देशातल पहील नौदल उभ केल,जलदुर्ग उभारले. शिवरायांनी वतनदारी पध्दती बंद सैनिकांना,अधिकार्‍यांना पगार सुरु केले.शे

पावसाच्या धारा

पावसाच्या धारा येती झरझरा झाकळले नभ, वाहे सोसाट्याचा वारा रस्त्याने ओहोळ जाती खळखळ जागजागीं खाचांमध्ये तुडुंबले जळ हर्षलासे फार नाचे वनीं मोर पानांतून हळूं पाहे डोकावून खार डोईवरी मारा झाडांचिया तळी गुरे शोधिती निवारा नदीलाही पूर लोटला अपार फोफावत धावे जणू नागीणच थोर झाडांची पालवी चित्ताला मोहवी पानोपानी खुलतसें रंगदार छबी ढगावर वीज झळके सतेज नर्तकीच आली गमे लेवुनिया साज झोंबे अंगा वारे काया थरथरे घरट्यांत घुसूनिया बसली पाखरें थांबला उजळे आकाश सूर्य येई ढगांतून, उधळी प्रकाश किरण कोंवळे भूमीवरी आले सोनेरी त्या तेजामध्यें वस्तुजात खुले सुस्नात जाहली धरणी हासली, वरुणाच्या कृपावर्षावाने संतोषली

आरक्षण कोणाला द्यावे

         आरक्षण असावे की नसावे याबाबत वेगवेगळी मते आहेत. ज्या दीनदलित समाजाने वर्षानुवर्षे उच्चवर्णीयांकडून होणारी अवहेलना सहन केली, त्या वर्गाला घटनेने आरक्षण दिले. तो त्यांचा अधिकारच होता. एककल्ली विचार करून आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेणे हे लोकशाहीविरोधी कृत्य ठरेल. सामाजिक आणि आर्थिक स्थैर्यासाठी आरक्षण हे हवेच. म्हणूनच आरक्षणाचा इतिहासही जाणून घेणे तेवढेच महत्त्वाचे ठरेल.सामाजिक व आर्थिक स्थैर्यासाठी आरक्षण हवेच सामाजिक आरक्षणाबाबत अनेक मते-मतांतरे आहेत. प्रत्येक जण आरक्षणाची मागणी करीत आहे. हे अयोग्यच आहे.            दीन-दलितांना, पिचलेल्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाचे हत्यार भारतर▪डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहाल केले. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळेच हा समाज आज मुख्य प्रवाहात आला आहे. हे प्रत्येकाने मान्यच केले पाहिजे. पूर्वीच्या काळात ही सोय होती काय? याचा पुनर्विचार केल्यास दलित समाजाला आरक्षणाची गरज का पडली? याचे उत्तर आपोआपच मिळाल्याशिवाय राहणार नाही. राजकीय इच्छाशक्ती काय असते? हे त्यावेळेस डॉ. आंबेडक र यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. डॉ. आंबेडकरांनी दल

जीवनात वाचनाचे महत्त्व

               वाचनाचे महत्व आपण आपल्या शालेय जीवनापासून ऐकत आलोय. प्रत्येकजण आपल्याला वाचन किती महत्वाच आहे हे सांगत असतो. परंतु आपण खरचं वाचन करतो का? वाचायला आवडते का? वाचून काही फायदा होतो का? लोक वाचनाला एवढे महत्व का देतात? वाचनाने माणूस सुसंस्कृत होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की, “वाचाल तर वाचाल”. हे खरेच आहे.              वाचनाने शब्द संपत्ती वाढते  वाचनामुळे आपल्याला नवनवीन माहीती मिळतेच तसेच ज्ञानात भर पडते.त्याचा उपयोग तो निबंध, वकृत्व, लेखन यामध्ये करू शकतो.लेखकांच्या कथा, कादंबरी, ललितलेख, कविता या विषयी माहिती मिळते. आपले सामान्य ज्ञान वाढते. त्याचा उपयोग त्याला भावी जीवनात होऊ शकतो. आपल्याला जर वाचनाची आवड असेल तर मित्रमंडळी किंवा लोकांमध्ये वावरताना आपण एखाद्या विषयावरील चर्चेत आपले मुद्दे योग्य प्रकारे मांडू शकतो. त्यामुळे त्यांच्यात मिसळण्यात मदत होते. वाचनामुळे आपण आपली मते ठळकपणे मांडू शकतो.           वाचन हे ज्ञान मिळवण्याचे साधन आहे.वाचनाने जीवन समृद्ध होते.जेव्हा आपण वाचत असतो तेव्हा त्या लेखकाच्या विचारांशी आपण तादात्म्य पावतो.त्यांच्या विचारां

जीवन खूप सुंदर आहे

जीवन इतके सुंदर आहे, अनुभव तुम्हास येत जाईल, प्रयत्न करायला विसरू नकात, मार्ग तुम्हाला सापडत जाईल. जीवन सुंदर आहे ते जगण्यासाठी आहे , जीवन सुंदर आहे ते जगून बघण्यासाठी आहे जीवनात बरेच कही करण्यासारखे आहे , करता करता बरेच काही शिकण्या सारखे आहे जीवन ही रंगभूमी आहे. जीवन म्हणजे दोन घडीचा डाव, जीवन हा एक संघर्ष जीवनात चढउतार असणार. जीवन खूप सुंदर आहे जीवन म्हणजे ऊन-सावलीचा खेळ असतो. जीवनात सुख  भरपूर असते तर जीवनात दु:ख हे क्वचितच आढळते. जीवनात जन्म एकदाच  होतो म्हणून जीवन हे भरभरून जगायचं असत जीवन खूप सुंदर आहे.

वृक्षतोड एक समस्या

          फार पूर्वीच कळली आहे. म्हणूनच एका संस्कृत श्लोकात सांगितले आहे की, जे त्यागाच्या भावनेने स्वत: उन्हात उभे राहतात, पण इतरांना सावली देतात; ज्यांची फळे-फुलेही दुसर्‍यांसाठीच असतात, असे त्यागमय जीवन जगणारे वृक्ष एखाद्या सत्पुरुषासारखेच भासतात. या वृक्षरूपी सत्पुरुषाचे सानिध्य अबाल्वृद्धाना, सामान्य जनांना व त्याचबरोबर सत्पुरुषांना लाभावे असे वाटते. म्हणूनच ऋषीमुनी रानावनात वस्ती करून निसर्गाच्या सान्निध्यात अध्ययन आणि तपश्चर्या करत असत. संत तुकाराम म्हणतात, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे |’ इंदिरा संत म्हणतात, ‘जरी वेधिले चार भिंतींनी, या वृक्षांची मजला सांगत .’ सामान्य माणूसही नेहमीच्या दगदगीपासून दूर जाण्यासाठी, हवापालटासाठी थंड हवेच्या ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यातच जातो. अशा या उपकारकर्त्या वृक्षांचा आज ऱ्हास होत आहे. मानवाने बेसुमार जंगलतोड करून वैराण वाळवंटे निर्माण केली आहेत. ‘After man the desert’, ‘मानवाचे पाऊल नि वाळवंटाची चाहुल’ अशी म्हण आहे. जळणासाठी आणि घरे बांधण्यासाठी बेसुमार वृक्षतोड केली गेली. त्यामुळे उष्णता वाढली. पावसाचे प्रमाण कमी झाले जमिनीची धूप होऊन ती नापी

लोक काय म्हणतील..........

तू हसतील तर ते जळतील तू रडलीस तर ते हसतील काही नवं केलं तर पाप म्हणतील जुन्यात अडकून राहिली तर श्राप म्हणतील...... गमावलं तर दरिद्री म्हणतील कमावलं तर माज म्हणतील पुढे निघालीस तर मागे ओढतील मागे राहिलीस तर तुडवतील........ तू हात दिला तर साथ म्हणतील तू तुझाच विचार केला तर स्वार्थ म्हणतील कौतुक केलं तर वाह म्हणतील उणीव दाखवली तर जा म्हणतील क काही केलं तर...... काय केलं ?म्हणतील नाही केलं तर...... काय केलं? म्हणतील म्हणूनच  .......... तू जग तुला हवं तसं ...... जगाचा काय? ते काहीही म्हणतील.......

आपत्ती आणि दक्षता

         भारत हा बहुसंख्य नैसर्गिक आपत्तीचा देश आहे वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनावृष्टी, अतिवृष्टी आणि पूर यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.बदलत्या पर्यावरणामुळे पावसाचा संतुलन बिघडते आहे.पायाभूत सुविधांचा बेफाम वाढ निसर्गातील मानवी हस्तक्षेप वाढत आहे दोन दशकांपासून दरवर्षी आसाम, बिहार व दक्षिण भारतात पूर येत आहे जीवितहानी बरोबरच कोट्यवधी च्या मालमतेचे नुकसान होत आहे .यावर  उपाय आहेत का?देशाच्या आणि  राज्यांच्या व स्थानिक पातळीवर काय उपाययोजना करणे गरजेचे आहे?             ऑगस्टमध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या पुराचा विचार करून, नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात नेहमीपेक्षा जास्त पर्जन्यवृष्टी झाली .ती अतिवृष्टी काही दिवस सतत होत होती.सेन्ट्रल वॉटर कमिशन आणि हवामान खात्याचा अंदाज आणि आराखडे उपलब्ध होते  सुरक्षित लोकांना सुरक्षित स्थळी कधी हलवायलचे याचे ठोकताळे सरकारने बंधने गरजेचे आहे.पुरसंबंधीच्या निळी आणि लाल आतील असुरक्षित लोकांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करणे गरजेचे आहे नद्या या कोणा एका राज्याच्या मालकीच्या नसून ,ती राष्ट्रीय संपत्ती आहे .सेन्ट्रल वॉटर कमिशन च्या