Posts

Showing posts from January, 2020

मुक्यांचे पत्र मूकनायक

            जातिसंस्था आणि अस्पृश्यता ही भारतीय समाजजीवनातील कीड असून अस्पृश्यांना अतिशय दयनीय, मानहानीकारक जीवन जगावे लागत होते. महात्मा फुले ,महाराज सयाजीराव गायकवाड ,छत्रपती शाहू महाराज ,गोपाळ बाबा वलंगकर यांनी अस्पृश्यता निवारणाचे कार्य सुरू केले होते .परंतु वरिष्ठ जातीच्या मनोभूमिकेत काहीही बदल झाला नाही. डॉ बाबासाहेबांना शिक्षण घेताना, नोकरी करताना , मानहानीची अपमानास्पद वागणूकीची जाणीव झाली होती .त्यामुळे हिंदू धर्माच्या सामाजिक आणि मानसिक गुलामगिरीतून मुक्त करायचे म्हणजेच त्यांचे प्रबोधन होणे आवश्यक असल्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी  प्रबोधनाकरिता आणि लोकजागृतीचे  कार्य करण्यासाठी वृत्तपत्रासारखे प्रभावी माध्यम दुसरे असू शकत नाही असे त्यांना वाटू लागले .              पंखशिवाय जसा पक्षी  त्याप्रमाणे समाजात विचार प्रवृत्त करण्यासाठी वृत्तपत्राची गरज असते असे डॉ  बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. महाराष्ट्रात अनेक वृत्तपत्र आले परंतु अस्पृश्याच्या समस्यांना वाचा फोडणारे त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणारे एकही वृत्तपत्र नव्हते .अस्पृश्यांच्या हिताचे चर्चा करायची असेल तर वृत्तपत

ऊसतोड कामगार माझे मायबाप

ऊस तोड कामगार माझे मायबाप सगळे जेव्हा साखर झोपेत असते तेव्हा उठते माझी माय पहाटे-पहाटे भाकरी थापल्या चा आवाज येतो माझ्या कानी  थप थप थप. उजाडता उजाडता उठतो माझा बाप  कोयता घेतो, त्याला धारदार करतो नि निघतो फडाच्या दिशेने उपाशीपोटी ऊस तोडत असतो माझा बाप ऊसतोडण्याचा आवाज येतो  माझ्या कानी ऊसतोड कामगार माझे माय बाप . माय जातीय भाकरी  भाजी घेऊन फडात  बाप टाकतो कोयता खाली घोळयामेळ्यानं जेवण करी घाई  घाई हातावर पाणी पडताच बाप घेतो कोयता उसतोडण्यासाठी  माय बांधते मोळ्या दोघांनाही असते आपले काम संपवण्याची घाई . किती कष्ट करतात ते माझ्यासाठी, किती सोसतात ते माझ्यासाठी  , शिकेन सवरेन ऑफिसर होईन खूणगाठ बांधली मनाशी सुखी ठेवीन माझ्या मायबापा  ऊसतोड कामगार माझे मायबाप.