Posts

Showing posts from April, 2018

Journalism

                                                                       वाचनातून मनाचा अभ्यास                   माझ्या मते भरभरून जगणं म्हणजे आयुष्यात येणाऱ्या सर्वच अनुभवांना समर्थपणे सामोरं जाणं आणि प्रत्येक क्षण अर्थपूर्ण जगणं. आयुष्याच्या काही काळापर्यंत मी नक्कीच अशी जगले नाही. पण ही इच्छा मात्र नक्की होती. काय करायचं , कसं करायचं असा निश्चित मार्ग सापडत नव्हता. मानसशास्त्र हा माझा आवडीचा आणि अभ्यासाचा विषय. या विषयावर माझ्या अनेकांशी गप्पा आणि चर्चा व्हायच्या. पण तरीही पुस्तकात शिकलेलं मानसशास्त्र आणि रोजचं जगणं याचं नातं जुळण्यात काहीतरी कमी पडतंय असं मला जाणवायचं. रोजच्या जगण्यातलं मानसशास्त्र किंवा रोजच्या जगण्यात मानसशास्त्राचा उपयोग कसा करता येईल आणि त्यातून आपलं जगणं आनंदी , समाधानी आणि समृद्धही कसं करता येईल याचा मी विचार करायला लागले. मग काही वेळा मला आवडलेली पुस्तकं , काही अनुभव मी माझ्या जवळच्या लोकांबरोबर शेअर करायला लागले. त्यावर साधकबाधक चर्चा , वाद व्हायचे. सर्वाना हे आवडायचं पण या वाचण्यात नियमितता नव्हती. या साऱ्यातून माझी मात्र समज वाढत गेली. अनेक वेळा आपल