जीवनात वाचनाचे महत्त्व

               वाचनाचे महत्व आपण आपल्या शालेय जीवनापासून ऐकत आलोय. प्रत्येकजण आपल्याला वाचन किती महत्वाच आहे हे सांगत असतो. परंतु आपण खरचं वाचन करतो का? वाचायला आवडते का? वाचून काही फायदा होतो का? लोक वाचनाला एवढे महत्व का देतात? वाचनाने माणूस सुसंस्कृत होतो.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की, “वाचाल तर वाचाल”. हे खरेच आहे.
             वाचनाने शब्द संपत्ती वाढते  वाचनामुळे आपल्याला नवनवीन माहीती मिळतेच तसेच ज्ञानात भर पडते.त्याचा उपयोग तो निबंध, वकृत्व, लेखन यामध्ये करू शकतो.लेखकांच्या कथा, कादंबरी, ललितलेख, कविता या विषयी माहिती मिळते. आपले सामान्य ज्ञान वाढते.
त्याचा उपयोग त्याला भावी जीवनात होऊ शकतो.
आपल्याला जर वाचनाची आवड असेल तर मित्रमंडळी किंवा लोकांमध्ये वावरताना आपण एखाद्या विषयावरील चर्चेत आपले मुद्दे योग्य प्रकारे मांडू शकतो. त्यामुळे त्यांच्यात मिसळण्यात मदत होते. वाचनामुळे आपण आपली मते ठळकपणे मांडू शकतो.
          वाचन हे ज्ञान मिळवण्याचे साधन आहे.वाचनाने जीवन समृद्ध होते.जेव्हा आपण वाचत असतो तेव्हा त्या लेखकाच्या विचारांशी आपण तादात्म्य पावतो.त्यांच्या विचारांशी आपण समरस होत असतो.आज महान लोक नसले तरी त्यांचे ग्रंथ आहेत,पुस्तके आहे कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला सतत त्या क्षेत्रातील नवेनवे ज्ञान,नवी नवी माहिती आणि अद्यावत कौशल्ये आत्मसात करावी लागतील. त्यासाठी वाचनाला अन्य पर्याय नाही  अनेक नोकरीच्या संधी वाचनामुळे निर्माण होतात. अनेक ठिकाणी वाचनीय ज्ञान चांगले असते त्याला उत्तम प्रकारच्या नोकरीच्या संधी असतात. उत्तम वाचन असेल तर काम करताना ईमेल लवकर समजून घेण्यास मदत होते. त्यामुळे कामाची गती वाढते.
           पुस्तके वाचून आपण आपल्या जीवनाला आकार देऊ शकतो. मात्र काय वाचावे?हे फारच महत्वाचे आहे.जीवन घडवणारी पुस्तके आहेत तशी जीवन बिघडवणारी पुस्तकेसुद्धा आहेत.यासाठी आपले शिक्षक,आई वडील,घरातील मोठी माणसे यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन पुस्तके वाचली पाहिजेत.वाढदिवस दणक्यात साजरा करण्याऐवजी वाढदिवसाला छान छान पुस्तके वाटली पाहिजेत.दिवाळीला फटाके वाजवण्याऐवजी दिवाळी अंक विकत घेऊन वाचले पाहिजेत 
युवक वाचतील तर देश वाचेल".

Comments

Popular posts from this blog

वृक्षतोड एक समस्या

आयुष्य जगण्याची  पद्धत