स्त्रीभ्रूणहत्या
भारतीय संस्कृतीमध्ये सत्ययुगात स्त्रीला महत्वाचं स्थान देण्यात आलं आहे. अनेक कथांमध्ये तर देवादिकांना अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी आदिशक्तींनी म्हणजेच स्त्री-रूपाने शक्य करून दाखविल्या आहेत, अशा अनेक कथा आपल्या ऐकीवात आहेत मग तो महिषासुराचा वध असु दे किंवा सीतेची अग्निपरीक्षा. आजही आपण धनप्राप्तीसाठी लक्ष्मीमाता, विद्येसाठी सरस्वती, संकटमुक्तीसाठी दुर्गेची उपासना करतो परंतु या सर्व आदिशक्तींची पुजा करताना मात्र आपला भारतीय समाज नवीन जन्माला येणाऱ्या स्त्रीचं अस्तित्व नाकारतो आहे.
स्त्रीभ्रुणहत्या आध्यात्मिक, सांस्कृतिक,औद्योगिक सर्व बाबतीत आघाडीवर असलेल्या आपल्या भारत देशामध्ये अशा घटना घडव्यात यांसारखे दुर्दैव कोणत
मुलगी झाली म्हणून मुलींची हत्या करणे ही एक चिंतेची बाब आहे.ग्रामीण व शहरी भागात शिक्षित अशिक्षित कुटुंबामध्ये मुलगा जन्माला का यावा वाटतो त्याची कारणे पुढीलप्रमाणे:-
1मुलगा वंशाचा दिवा असतो.2.
2.मुलगा हा कमवत धन असल्यामुळे
3,लग्नामध्ये कायदा असूनही मुलीला हुंडा द्यावा लागतो खूप खर्च होतो .4मुलगा हा म्हटरपणाचा आधार असतो .5मुलगा हा मुलीपेक्षा सशक्त असतो .तर मुली कमजोर असतात
6मुलींच्या शिक्षणावर केलेला खर्च वाया जातो तिच्या शिक्षणाचा आपल्या फायदा होत नाही.
आपली भारतीय संस्कृती पुरुषप्रधान संस्कृती म्हणून ओळखली जात.मुलगा नसेल तर वंश संपुष्टात येईल, चितेला अग्नी कोण देणार, पिंडदानकव करेल यांमुळे समाजात मुलीला तर हे जग पाहण्याची संधी दिलीच जात नाही कधी दिली तर पहिली बेटी धनाची पेटी असे म्हणत पहिली मुलीला लक्ष्मीच्या रूपाने स्विकारलं जातं परंतु दुसरी मुलगी झाली तर तर तिला अभिशाप म्हणून जन्माला येते पहिल्या मुलानंतर मुलगा चालतो पण मुलगी नसेल तरी चालते असं का करतो हा समाज तेच कळत नाही,आज जरी स्त्री सर्व यशस्वी होत असली तर पुरुषी मानसिकता बदललेली नाही आजच्या युगामध्ये स्त्री ही पुरुषाएवढीच आघाडीवर आहे असे आपल्याला पाहायला मिळते एकविसाव्या शतकात स्त्रीला समाजात मोठे स्थान दिले जाते सर्वच क्षेत्रात स्त्रिया ह्या पुरुषांच्या बरोबरीने आहेत हे जरी खरे असले तरी या सर्व गोष्टी ठराविक वर्गापूरत्याच मर्यादित आहेत आजही ती तिच्या हक्कापासून वंचीत आहे असे वाटते .
Comments
Post a Comment