मी शेतकरी बोलतोय
आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. भारतात जवळपास ७०% लोक शेती हा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. आपले शेतकरी-बांधव रात्रंदिवस शेतात काम करतात, बी पेरणीपासून ते धान्य बाजारपेठेत पोहोचवन्या पर्यंतचे सर्व कार्य शेतकरी करतो. रात्रंदिवस शेतात मेहनत करतो, परंतु शेती ही पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे, कधी ओला-दुष्काळ, तर कधी कोरडा दुष्काळ, तर कधी वादळ, गारपीटीला सामोरे जावे लागते, त्यातच शेतीचे फार नुकसान होते, शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, दोन वेळचे पोटभर अन्नही त्याला मिळत नाही. शेतात लावलेली मिळकतहि शेतीतून निघत नाही. त्यामुळेच आपला शेतकरी बांधव हा आत्महत्येचा मार्ग अवलंबतो
शेतकरी आत्महत्या ही भारतीय समाजामधील एक फार मोठा समस्या म्हणून आज समोर आली आहे खरी अर्थाने भारत देशामध्ये शेतकरी वर्गाला जगाचा पोशिंदा म्हटले आहे शेतकऱ्यांच्य नावाने जय जवान जय किसान असा नारा दिला जातो भारत हा कृषी प्रधान देश आहे असे गर्वाने म्हंटले जाते असा समाजामध्ये शेतकऱ्यांच्य आत्महत्या होतात ही चिंतेची बाब नाही का त्यातली त्यात भारतात सर्वात जास्त आत्महत्याचे प्रमाणात महाराष्ट्रात आहे शेतकरी म्हणजे आपला बळीराजा. वरूणा कडे चातकासम वाट पाहणारा शेतकरी. असा तो बरसला की, चेह-यावर आनंदी-आनंद पसरतो. पण वाट पाहूनही वरुण राजाचा रुसवा त्याला झेलावा लागतो तेव्हा मात्र शेतक-याचे डोळे आसवांनी भरतात. डोळ्यांदेखत पिक जेव्हा पाण्याविना जळू लागतात तेव्हा त्याच्या मनाची होणारी घालमेल, उथल-पुथल शब्दात व्यक्त करता येत नाही.
मी शेतकरी…
माझी हिच नशिबाची कहाणी.
पडला वेळेवर पाऊस,
तर पिकत सोन.
नाहीतर डोळ्यात आसवांचे पाणी.
सा-या विश्वाचे पोट भरणारा आपला शेतकरी मायबाप, त्याच्या नशीबी कधी-कधी दोन वेळच अन्न पण मिळत नाही. तुटपुंज्या पैशात कर्ज काढून तो आपले शेत पिकवतो. पण कधी शेतमालाला कमी भाव, तर कधी निसर्गाच्या चक्रात तो असा अडकतो की, हातातोंडाशी आलेल पिक पाण्याविना जळून तर जात वा अतिवृष्टी मुळे नेस्तनाबूत होत.
काही वेळा कर्जाची परतफेड न झाल्याने त्रस्त शेतकरी आत्महत्या करतो. पण खरचं यावर काही ठोस उपाययोजनेची आवश्यकता आहे. आपले पोट भरणारा शेतकरी आज निराश-हताश आहे. तो वाट पाहतोय कुणी मदतीचा हात सरसावून या संकटातून मार्ग दाखवेल का ?
आज शेतक-यांवर बिकट परिस्थिती ओढावली आहे. गरज आहे ठोस पाऊले उचलण्याची. पिकांना रास्त भाव मिळवून देण्याची आणि कर्जबाजारीपणाचा बोझा कमी करण्याची. निसर्गाची अवकृपेला सर्वस्वी मनुष्यच जबाबदार आहे. वाढत्या वसाहतीमूळे वृक्ष तोड अमाप झाली. परिणामी पाऊस सरासरीहून कमी झाला. आता वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धन करण्याची नितांत गरज आहे. तरच निसर्गाशी आपली नाते अबाधित राहील आणि आपला शेतकरी राजा खूश राहील.
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता स्वतःचा मार्ग स्वतः शोधला पाहिजे.शेती जोडून पूरक व्यवसाय केला पाहिजे शेतीला जोडून वेगवेगळे जोडधंदे केले तर आत्महत्या करण्याची गरज नाही.स्वतःचा जीव संपवून मिळत तरी काय स्वतःचा जीव तर गमावून बसताच बसत पण कुटुंबाला दुःख देता .तुम्ही गेल्यानंतर पत्नी एकंदरीत तुमच्या कुटुंबावर काय परिस्थिती निर्माण होते त्याचा विचार करा .आणि "आत्महातेला टाळा."
Comments
Post a Comment