पाणी वाचवा जीवन वाचवा
पाणी हे निसर्गाने दिलेले अमूल्य असे स्तोत्र आहे , पाणीच जर नसेल तर.... हि कल्पना सुद्धा अंगावर शहारे आणून सोडते . सकाळपासून तर रात्रीपर्यंत पाण्याचा प्रत्येक कार्यात उपयोग होतो. विशेषतः पाणी पिण्यासाठी वापरले जाते. पृथ्वीचा ७०% भाग पाण्याने व्यापला आहे . परंतु तरीही आज पाण्याची टंचाई सर्वदूर जाणवत आहे. मोठ्या प्रमाणात होणारे व्यापारीकरण , शहरीकरण यामुळे पाण्याच्या साठवणुकीला तडा जात आहे. रस्ते बांधकामासाठी नदी नाल्यांची दिशा बद्दलि जात आहे. त्यामुळे सर्वदूर पाण्यासाठी वणवण होत आहे, म्हणूनच सर्व नागरिकांनी आपल्या दैनंदिन जिवनात पाण्याचा वापर सांभाळून करावा . घरातील सांडपाणी शेतात सोडावे, वॉटर हार्वेस्टिंग ची सुविधा करावी, जास्तीत जास्त पाणी जमिनीत कसे मुरवता येईल याचा अभ्यास करावा. लोकसहभागातून शेतात बंधारे तयार करावेत , कारण "जल है तो कल है!" म्हणूनच पाण्याचा खालील प्रमाणे करावा:-
1) "तोंड धुताना मगमध्ये पाणी घेऊन तोंड धुवावे. २). नळ व्यवस्थित बंद करावा. कामकरणी नळ बंद न करता कपडे धुतात. त्यामुळे पाणी वाया जाते. त्यांना असे न करण्यास सांगावे. ३). पंप लावला असता, पाणी वाहून जाण्याची वाट न बघता, पंप आधीच बंद करावा. परत लावावा लागला तरी चालेल. ४). बागेला एक दिवसआड पाणी घालावे. ५). तांदूळ, डाळ, भाजी धुतलेले पाणी झाडांना घालावे. ६). स्विमिंग टँक बंद करावे. ७). विहिरी जेथे जेथे होत्या, त्या परत साफ करून घ्याव्यात. ते पाणी भांडी, कपडे, शौचालय, बाथरूम धुण्यास वापरता येईल. ८). जास्त पाणी वापरणाऱ्यांना दंड आकारावा. तरीही त्यांनी जास्त पाणी वापरले तर त्यांचे कनेक्शन कट करावे. ९). शौचालयात फ्लश ओढताना जास्त वेळ दाबून ठेवू नये, म्हणजे पाणी जास्त वाया जात नाही. १०). आंघोळ, बादलीत पाणी घेऊन करावी.
*पाणीबचत व वापर यांविषयी जाणीव
जागृती करण्यासाठी घोषवाक्य :-
1)प्रत्येकाचा एकच नारा, पाण्याची काटकसर करा.
२)थेंब थेंब वाचवू पाणी, आनंद येईल जीवनी.
3)पाणी अडवा पाणी जिरवा ,
मोलाचे मानवी जीवन वाचवा.
४)वाचविल्यास जलसंपदा, सिंचनास होईल फायदा.
6बचत पाण्याची, गरज काळाची.
7)वाचवू मिळून सारे थेंब थेंब पाण्याचा,
हाच एकमेव मार्ग सुखाकडे जाण्याचा.
८पाणी बचत म्हणजे पाणी निर्मिती.
Comments
Post a Comment