आई
आईसाठी काय लिहू
आईसाठी कसं लिहू
आईसाठी पुरतील एवढे शब्दच नाहीत कुठे
आई वरती लिहिण्यास व्यक्तिमत्त्व नाही मोठे
'आई '.......म्हणजे नेमके काय?
आई तू उन्हातली सावली
आई तू पावसातली छत्री
आई थंडीतली शाल
आता कितीही अडचणी येऊ खुशाल
'आई '.......म्हणजे नेमके काय?
हे कोणी सांगू शकणार नाही
पण तरीही मला वाटते
आई म्हणजे आपल्या मुलीला
या जगात तूच सर्वश्रेष्ट आहेस
असा आत्मविश्वास देणारी
एक महान ,प्रेमळ व्यक्ती आई
'आई '.......'आईच' असते .
Comments
Post a Comment