वृक्ष
वृक्षावरच आहोत आपण सर्वस्वी अवलंबून
त्याच वृक्षाला सांगा का टाकतो संपवून
फळे फुले शीतल देतात छाया
त्यांना आपण केव्हा लावणार माया
वृक्ष लावा केवळ आपण म्हणतो
नारा म्हणून सोडून देतो .
वृक्ष संगे सोयरे केवळ नाही म्हणायचे
प्रत्येकाने एक तर झाड लावायचे
फळ फुलांच्या भाराने नम्रपणे डोलतात
त्यांच्या तोडीची सुद्धा ते कुठे तक्रार करतात.
Comments
Post a Comment