नातं असच असतं
नातं म्हणजे प्रेम आणि विश्वास यांचा रेशीम धागा
जन्म घेतल्या क्षणा पासून नातं या धाग्याने गुंफले जाते
जीवनात नाती तशी खूप असतात
ती नाती जपणारी लोक कमीच असतात
काही नाती जन्मोजन्माची असतात
तर काही क्षणापूरती असतात
काही नाती असतात रक्ताची तर
काही नाती असतात हृदयाची
काही नाती लांबून आपली म्हणणारी
तर जवळ गेल्यावर दूर करणारी
काही नाती पैशाने विकत घेणारी
तर काही प्रेमाने आपलेसे करणारी
Comments
Post a Comment