सोपं नसतं घर सोडून राहणं

सोपं नसतं घर सोडून राहणं
नातेवाईक म्हणतात बाहेर राहिली म्हणून बिघडली
खरं तर ते बिघडलेली नसते.
बाहेर राहून जगायला शिकते जगाप्रमाणे वागायला शिकविते
घरच्यांना वाटत की मोकळेपणा मिळाला कशी वागतील
खरं तर मोकळेपणा नसत
पैसे  जपून वापरावे लागतात कारण
पैश्याची किंमत कळलेली असते
घरी जेवण आवडलं नाही की चिडचिड करणार
पण होस्टेलला येऊन जे डब्याला येत ते खात
कधी  डबा नसला की उपाशीपोटी  झोपते
पण कधी बाहेर किंवा हॉटेलमध्ये जात नाही
एखादी वस्तू  आवडली की घ्यावा वाटते पण
इच्छा असूनही घेत नाही.......
तेच पैसे दुसऱ्या वेळेस कामी येतील असं वाटत
दुसऱ्यांना वाटत असते की फ्रीडम मिळालं
हे कसलं फ्रीडम.....
एक दडपण असतं बाहेर राहण्याचं ........
दोन दिवस घरी  गेलं आनंद होतो पण
घरून परत येताना मात्र दुःख होते पण पर्याय नसतो
सोपं नसतं घर सोडून राहणं

Comments

Popular posts from this blog

जीवनात वाचनाचे महत्त्व

वृक्षतोड एक समस्या

आयुष्य जगण्याची  पद्धत