Posts

Rose डे

Rose त्या मातेला द्या जी जन्म देऊन आयुष्यभर  सांभाळते. Rose त्या बहिणीला द्या जी आपल्यावर नेहमी माया करते. Rose त्या भावाला द्या जो  सतत पाठीशी उभा राहतो. Rose त्या बापाला द्या जो स्वतः पेक्षा जास्त प्रेम आपल्या मुलांवर करतो. Rose गुरूला पण द्या जो आपल्याला आयुष्य जगण्याचा मंत्र देऊन जातो. Rose त्या मित्राला द्या जो आपल्या सुखदुःखात साथ देतो. Roseत्या मैत्रिणीला द्या जी तुमची कदर करते ,जी तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करते. Rose फक्त प्रियसीलाच द्यावं असं काही ठरलेलं नसतं. तुम्ही कोणालाही देऊ शकता ज्यावर तुम्ही प्रेम  करता

प्रेम करायचं राहून गेलं

शाळेत असताना प्रेम काय असतं माहीतच नव्हत        .......   म्हणून माझं प्रेम करायचं  राहूनच गेलं . सहावीपासून  मुलींच्या हॉस्टेलला असल्यामुळे  कधी मुलांशी संपर्क आलाच नाही .          .......म्हणून माझं  प्रेम  करायचं राहूनच गेलं. दहावीत असताना वाटायचं चांगल्या गुणांनी पास व्हायचंय म्हणून फक्त अभ्यास आणि अभ्यासचं करायचे         .......  म्हणून माझं प्रेम करायचं राहूनच गेलं आता कुठं प्रेम काय असतं कळायला लागलं होतं पण काय करणार बारावी हा आयुष्याचा टर्निंग पॉईंट असतो म्हणून अकरावीच्या दिवाळीतच क्लास लावले नि बारावीचा अभ्यास सुरू केला          .......  म्हणून माझं प्रेम  करायचं राहूनच गेलं. नंतर शहरात गेले वाटलं होतं प्रेम करावे म्हणून पण प्रेमात पडलेल्या लोकांचे भांडणे पाहून नको वाटायला लागले प्रेम         .......   म्हणून माझं  प्रेम  करायचं राहूनच गेलं आपण कुणावर तरी प्रेम केलं तर  या समाजातील लोक आपल्या आई...

आदर्श शिक्षक

दगड गोट्या चिंचोक्याचा खेळ खेळलेला . खेळ नव्हे तो शिकवणी निराळी  अ आ इ, A B C D,उजळणी  मजेशीर पाठ करून घेणारे , शिक्षणाची गोडी लावली तुम्ही. खुप विद्यार्थी घडवलेत तुम्ही , घडवत आहात. ज्यात मी स्वतः ला नशीबवान समजते आईवडिलांनंतर पहिले गुरू लाभलात मला . ओढ मनाला होती भेटण्याची  कधी भेटेल झालं होतं ज्यांनी मला पहिल्यांदा  अक्षरओळख करून दिली त्या गुरूला . 25 नोव्हेंबर सुवर्णदिन आपल्या भेटीचा . काही क्षण हे स्वप्न  तर नव्हे असं वाटलं  भेटले नि मन तृप्त झालं .           

बाप

बाप नेहमी  मुलांचं विचार करतो आपले मुलं काय केल्याने सुखी होईल हेच तो बघत असतो बाप लेकाच्या नात्यात रुसवा नसावा  नेहमी नात्यात गोडवा असावा बाप लेकाच नात हे मैत्रीसारखं असावं बाप रुसला ते लेकाने मनवावे, लेक रुसला तर बापाने मनवावे बापाच्या प्रत्येक कामात लेकाने मदत करावी किती रे दिवस राहिलेत त्या बापाचे पिकलं पान कधीतरी सुकणारच  आहे तोपर्यंत मित्रासारखं जप त्याला तुझ्याच्या सुख नाही देणं झालं तरी चालेल पण निदान दुखवू तरी नको त्या बापाला

शेतकऱ्यांची खंत

शेत बहरलं होतं  मन आनंदी झालं होतं  भाववाढ नाही म्हणून  मन कुठेतरी खचत होतं कधी निसर्ग साथ देत नाही तर कधी भाव वाढ होत नाही जगावं तर शेतकऱ्यांनी जगावं  तरी कसं तेच कळत नाही दुष्काळ झाला की  सरकार जाहीर करतं  शेतकऱ्याला इतकी इतकी  नुकसान भरपाई पण ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते कधी शेतकरी आत्महत्या करतो तरी का हा प्रश्न सगळ्यांना पडतो, तो किती संकटाना सामोरे जातो  हे फक्त एक शेतकरीच समजून घेऊ शकतो.

ध्येय

ध्येय प्रत्येकाचं असतं ध्येय गाठण्यासाठी प्रत्येकजण आपआपल्या परीने  लढा देत असतो स्वप्न पाहिले पाहिजे त्याचबरोबर आपण पाहिलेलं स्वप्न साक्षात उतरविले पाहिजे काहीही अडचणी आल्या तरीही त्यांना घाबरायचं नाही प्रयत्न करीत राहायचे  एकदिवस ते नक्कीच पूर्ण होईल त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं  जे प्रयत्न करत ना  त्याला त्याचं फळ दिलं जातं

मुक्यांचे पत्र मूकनायक

            जातिसंस्था आणि अस्पृश्यता ही भारतीय समाजजीवनातील कीड असून अस्पृश्यांना अतिशय दयनीय, मानहानीकारक जीवन जगावे लागत होते. महात्मा फुले ,महाराज सयाजीराव गायकव...

ऊसतोड कामगार माझे मायबाप

ऊस तोड कामगार माझे मायबाप सगळे जेव्हा साखर झोपेत असते तेव्हा उठते माझी माय पहाटे-पहाटे भाकरी थापल्या चा आवाज येतो माझ्या कानी  थप थप थप. उजाडता उजाडता उठतो माझा बाप  कोय...

मैत्री

मैत्रीचं नातं रक्ताचं नसत पण हृदयापासून बनलेलं असतं. मैत्री ही सुख दुःखाच्या वेळेस साथ देणारी असते. मैत्री ही एकमेकांचा विश्वास असतो , मैत्री ही जीवनाचा आधार असतो . मैत्...

सोपं नसतं घर सोडून राहणं

सोपं नसतं घर सोडून राहणं नातेवाईक म्हणतात बाहेर राहिली म्हणून बिघडली खरं तर ते बिघडलेली नसते. बाहेर राहून जगायला शिकते जगाप्रमाणे वागायला शिकविते घरच्यांना वाटत की मोकळेपणा मिळाला कशी वागतील खरं तर मोकळेपणा नसत पैसे  जपून वापरावे लागतात कारण पैश्याची किंमत कळलेली असते घरी जेवण आवडलं नाही की चिडचिड करणार पण होस्टेलला येऊन जे डब्याला येत ते खात कधी  डबा नसला की उपाशीपोटी  झोपते पण कधी बाहेर किंवा हॉटेलमध्ये जात नाही एखादी वस्तू  आवडली की घ्यावा वाटते पण इच्छा असूनही घेत नाही....... तेच पैसे दुसऱ्या वेळेस कामी येतील असं वाटत दुसऱ्यांना वाटत असते की फ्रीडम मिळालं हे कसलं फ्रीडम..... एक दडपण असतं बाहेर राहण्याचं ........ दोन दिवस घरी  गेलं आनंद होतो पण घरून परत येताना मात्र दुःख होते पण पर्याय नसतो सोपं नसतं घर सोडून राहणं

मोबाईल शाप की वरदान

मोबाइलमुळे जगात क्रांती झाली हे खरेच! तसं बघितलं तर मोबाइल वरदानच ठरावा. कुठेही कधीही आपल्याला आपल्या माणसांना मित्रपरिवाराला, आणीबाणीच्या वेळी, महत्त्वाच्या कामासा...

शिक्षणाचा खेळखंडोबा

शिक्षणाने मानुस मोठा होतो ,   शिकल्या सवरल्याने  मनुष्यला योग्य - अयोग्यतेची जाणीव होते, शिक्षणानेच मानुष्य प्रगती साधु शकतो  आणि शिक्षण हे तर बाघिनिचे दूध आहे आणि हे दु...

गुरू क्या होता है ।

जीवन जितना सजता हैं माता-पिता के प्यार से उतना ही महकता हैं गुरु के आशीर्वाद से समाज कल्याण में जितने माता पिता होते हैं खास उतने ही गुरु के कारण देश की होती हैं साख बिन गुरु...

आयुष्य जगण्याची  पद्धत

आयुष्य जगण्याची एक पद्धत हवी जिथे आपली कदर नाही तिथं कधी जायचं नाही जे आपल्याला पचत नाही ते कधीही खायचं नाही जे खरं सांगूनही रागवतात त्यांना मनवत बसायचं नाही एकदा नजरे...

प्रेम करावे

जमेल तसे प्रत्येकाने ... .....कुणावर तरी प्रेम करावे ... कधी संमतीने ..कधी एकतर्फी .. पण,दोन्हीकडे हि सारखे  करावे ..!! प्रेम सखीवर करावे .. बहिणीच्या राखीवर करावे ..! आईच्या मायेवर करावे .. ...

भारतरत्न ते देशाचे

शिल्पकार ते घटनेचे, उद्धारक ते उपेक्षितांचे, विरोधक ते वर्णभेदाचे, भारतरत्न ते देशाचे…जय भिम ! दूत ते शांतीचे, प्रचारक ते समतेचे, प्रसारक ते धम्माचे, भारतरत्न ते देशाचे…...

स्वच्छ भारत

भारत भूमी ची वाढवू शान ठेवूनी जगात ताठ मान मिळूनी सारे हाती घेऊ स्वच्छ भारत अभियान…धृ… आरंभ करू या घरापासूनी मग आपुला शेजार रस्ते, गल्ल्या, चौक, बागा भरतो जिथे बाजार निर्...

जीवनात चुका तर होणारच

जीवनात चुका तर होणारच चुकांना कधी घाबरायचे नसते, पहिले स्वतःच्या मनाला सावरायचे असते. मग चुकलेला गोष्टींना आवरायचे असते. सर्वजण जीवनात जगत असताना चुकत असतात त्यामुळ...

नशीब हे असच असतं

नशीब हे असच असतं जी माणसे हवीशी वाटतात ती कधीही भेटत नाही जी माणसे नकोशी वाटतात त्यांचा सहवास संपत नाही ज्यांच्याकडे जावेसे वाटते त्यांच्याकडे जायला जमत नाही ज्यांच्...

प्रत्येक व्यक्तीच आयुष्य ही एक वेगळी कथाच

प्रत्येक व्यक्तीच आयुष्य ही एक वेगळी कथाच असते. अशी कथा जिचा पैलू न पैलू हा फक्त त्याच व्यक्तीला माहिती असतो.जगाला जे सांगितलं ते आणि जगापासून लपवलं ते देखील. अनेकदा देवा...